ईद दिवशी वीज पुरवठा सुरु ठेवा

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे महावितरणला निवेदन..

⚡कुडाळ ता.१४-: सोमवार दिनांक १७ जून २०२४ रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद-उल-अजहा हा सण असल्याने त्या दिवशी वीज पुरवठा अखंडित सुरु ठेवावा असे निवेदन सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील याना देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १७ जून रोजी मुस्लीमधर्मीयांची ईद, “इद-उल-अजहा” साजरी होणारी आहे. त्या दिवशी सोमवार येत आहे आणि सोमवारी विद्युत महावितरण विभागाकडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो. “इद-उल-अजहा” इद च्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक १७ जून रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवण्यात यावा. असे निवेदन सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने अधीक्षक अभियंता, महावितरण, सिंधुदुर्ग याना देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक एजाज नाईक, उद्योजक मुश्ताक शेख, जफर जमादार, सिराजभाई शाह, हाफीज जहेज शेख, साजिद दोस्ती आणि अन्य नागरीक उपस्थित होते.

You cannot copy content of this page