बांद्यात सायंकाळी चार वाजता होणार जंगी स्वागत; पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, संजू परब ,महेश सरांग आवाहन..
⚡बांदा ता.१४-: सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आज शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्यांचे बांदा येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
श्री राणे यांचे आज सायंकाळी मोपा एअरपोर्ट येथे आगमन होणार असून त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात भाजप बांदा विभाग व शहराच्या वतीने ढोल पथकासह फटाक्यांच्या आतिषबाजित दणक्यात स्वागत करण्यात येणार आहे. तरी सर्व लोकप्रतिनिधी भाजप पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर , जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजपा जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी केले आहे.
