मनसेच्या तक्रारीची घेतली दखल..
कुडाळ : संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमणावर कुडाळ नगरपंचायतीच्या सतराही नगरसेवकांचे एकमत झाले आहे. सत्ताधारी महाविकस आघाडीच्या ९ तर विरोधी ८ नगरसेवकांनी यासंदर्भात बिल्डरला दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी कुडाळ नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
या बाबत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अतिक्रमणाबाबत मनसेने तक्रार दिली होती. दरम्यान जनतेच्या प्रश्नांवर एकत्र आलेल्या नगरसेवकांचे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आभार मानले आहेत.
