⚡देवगड ता १३-: शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेचे प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पुरळ जि. प. मतदारसंघातील गिर्ये गावातील ज्येष्ठांचा युवासेनेतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेने जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी जि. प. सदस्य वर्षा पवार, युवासेनेचे देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी, विभागप्रमुख संदीप डोळकर, युवासेनेचे विभागप्रमुख जितेश जाधव, गिर्ये माजी उपसरपंच जहीर ठाकूर, युवासेनेचे शाखाप्रमुख जयदीप तिर्लोटकर, गिर्ये ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान केला जाणार आहे.
गिर्ये येथे युवासेनेकडून ज्येष्ठांचा सन्मान…
