सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये एस् . एस् . सी . विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा उत्साहात संपन्न …

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक वर्ष २०२३ – २४
एस् . एस् . सी परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली . यामध्ये प्रथम .कु. आमना नासीर गवंडी ( ९४ .६० % ) , द्वितीय कु .झैद इफ्तेखार अहमद बेग (९१% ) तृतीय कु . प्रविण पप्पुराम सैनी ( ९०.४० % ) तर कु . रय्यान रिझवान पटेल ( ८९ .८० %) गुण मिळवून चौथा आणि कु . आर्या महेश आळवे
(८९ .२० % ) गुण मिळवून
पाचवी आली . तसेच १८ विद्यार्थी विशेष प्राविण्य आणि ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले . या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा बुधवार
दि. १२-०६ – २०२४ रोजी प्रशालेत संपन्न झाला . या गुणगौरव सोहळ्याला सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष श्री . इम्तियाज खानापूरी , उपाध्यक्ष श्री. नासीर शेख व उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग ,सचिव श्री . हिदायतुल्ला खान , सहसचिव श्री.सुलेमान बेग ,सदस्य श्री . परवेज बेग, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला
हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , दहावी वर्गांच्या पालक प्रतिनीधी श्रीम. मुमताज बंगलेकर गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते .प्रशालेच्या मुख्याधापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनी पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .
सहाय्यक शिक्षिका श्रीम. मेहराज शेख व श्रीम. निलम सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक व पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी कु . आमना गवंडी , कु . झैद बेग , कु . प्रविण सैनी यांना पुष्पगुच्छ व धनादेश देऊन प्रशालेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून कु . आमना गवंडी, कु. मसिया आत्मेडा, कु . आर्या आळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . इयत्ता दहावी वर्गाच्या पालक प्रतिनीधी श्रीम.मुमताज बंगलेकर यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे सहसचिव श्री. सुलेमान बेग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . संस्थेचे सचिव श्री . हिदायतुल्ला खान यांनी विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता व गुणवत्ता ओळखून आवडीनुसार क्षेत्र निवडण्याचा सल्ला पालकांना दिला . सर्व विदयार्थ्यांनी जिद्दीने आपले ध्येय प्राप्त करावे ,असे मौलिक विचार संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले . उपस्थित सर्वांनीच प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

You cannot copy content of this page