⚡मालवण ता.०१-: बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण बौद्धवाडी येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण प्रवीण खोब्रागडे व त्यांच्या सुविधा पत्नी खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले
दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुकाच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मालवण बौद्धवाडी समाज मंदिर येथे साजरी करण्यात आली. नागपूर येथील प्रवीण खोब्रागडे यांनी मालवण साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्ध पुतळा भेट दिला होता त्याचे अनावरण प्रवीण खोब्रागडे व त्यांच्या सुविधा पत्नी खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मालवण नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या रंगमंचाचे उद्घाटन ज्येष्ठ सभासद सुरेश मालवणकर यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम , जिल्हा महासचिव आनंद धामापूरकर, जिल्हा संस्कार विभाग प्रमुख सूर्यकांत बिबवणेकर गुरुजी मालवण तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव ,उपाध्यक्ष दुलाजी चौकेकर सचिव गंगाधर कदम सामाजिक कार्यकर्ते पी.के. चौकेकर ,जिल्हा संघटक पुरुषोत्तम मालवणकर, शहर सचिव बबन मालवणकर, नरेंद्र पेंडूरकर , बबन पेंडूरकर , विलास नाईक , संदेश डिकवलकर, दादू चौकेकर, विद्याताई जाधव आदी व इतर उपस्थित होते
यावेळी आयोजित जाहीर सभेचा कार्यक्रम तालुका अध्यक्ष सिद्धार्थ जाधव अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना आनंद धामापूरकर जिल्हा महासचिव यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक अध्येयधोरणाची माहिती देऊन भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले बुद्धाचे तत्त्वज्ञानाने मानवाचे कल्याण होईल म्हणून प्रत्येकाने त्रीसरण पंचशील यांचे पालन करावे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांनी केले.सिद्धार्थ जाधव यांनी मालवण तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेचे जास्तीत जास्त सभासद करून गाव शाखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. यावेळी प्रवीण खोब्रागडे,पी.के. चौकेकर, नरेंद्र पेंडुरकर यांनी शुभेच्छा दिल्या. येथील प्रतिभा मालवणकर आणि अक्षय मालवणकर कुटुंबीयांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली बबन मालवणकर यांनी सर्वांचे आभार मानले . कार्यक्रमाला जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव, अॅड. सुमित जाधव, विलास देऊलकर, आबा मालवणकर, श्रीकांत मालवणकर, संतोष जाधव, हेमंत वायंगणकर, संतोष मालवणकर, देवगडकर तसेच वाडीतील धम्मबांधव, महिला उपस्थित होते
