कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्था व कुडाळ पत्रकार संघाच्या वतीने शाहिदाना श्रद्धांजली
*💫कुडाळ दि.२६-:* “आपली सजगता देशाच्या सुरक्षिततेची भिंत ठरू शकते’ सिव्हील ड्रेस मधील पोलिसांची भूमिका प्रत्येक देश देशवासीयांनी निभावल्यास दहशदवादी आपल्या देशात शिरकाव करू शकणार नाहीत; मात्र देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे; त्यांची जाणीव ठेवून देशप्रेम जागृत ठेवूया .”असे उद्गार कुडाळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री .शंकर कोरे यांनी काढले २६/ ११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये ध्येय प्रतिष्ठान, तालुका पत्रकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “आपले प्रेम देशप्रेम आपल्या कृतीतून दिसू द्यावे. आपल्या अवतीभवतीच्या संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून त्या पोलिसांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जनतेनेही उचलली पाहिजे. समाज सुधारणे बरोबरच राष्ट्रप्रेमही आपल्या दैनंदिन वागण्यातून दिसले पाहिजे.” असे सांगत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था व त्यांचे मार्गदर्शक चेअरमन उमेश गाळवणकर हे याचे उत्तम उदाहरण आहे .देशासाठी बलिदान केलेल्यांची आठवण काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम म्हणून २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे हे देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यभावनेचे एक उत्तम उदाहरण ठरावे .अशा शब्दात या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले व संस्थेच्या प्रांगणात उभारलेल्या दिमाखदार शहीद स्तंभा समोर पुष्पचक्र अर्पण करुन एन.सी.सी. छात्र व एन.एस. एस. स्वयंसेवक व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये शहिदांना आदरांजली अर्पण केली. याचवेळी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान तयार करणाऱ्या सर्व व्यक्तींना ही विनम्र अभिवादन करत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला श्री.कोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत ध्येय प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमित सामंत , कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, चेअरमनउमेश गाळवणकर व विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य उपस्थित होते. . संविधानाच्या प्रास्ताविकेचे प्रा. प्रणाली मयेकर यांनी वाचन करून उपस्थितांनी सुद्धा त्याप्रती असणारी आपली प्रतिबद्धता ही व्यक्त केली . कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पालकर यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना प्रती व सामान्य जनतेप्रती बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने आदराची भावना व्यक्त केली जाते .सुनियोजित असे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याबद्दल समाधान व्यक्त करत इतरांनाही त्यांचा आदर्श समोर ठेवून काम करण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले व शहिदांना मानवंदना अर्पण केली.यावेळी उपस्थित मान्यवरांना बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे सविधान पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी केले सूत्रसंचालन ऋचा कशाळीकर, तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रणाली मयेकर यांनी मानले. यावेळी विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य बी.एड.चे प्राचार्य परेश धावडे नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूलच्या मधुरा इंसुलकर, पल्लवी कामत व इतर मंडळी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतम वालावलकर, प्रसाद कानडे, योगेश येरम विशेष मेहनत घेतली.या वेळी सोशल डिस्टन्सचे नियम पाळून विविध अभ्यासक्रमाचे प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .