आपल्या मातीची व शाळेचे नाते माजी विद्यार्थ्यांनी जपावे…

रा. पां. जोशी:रा. कृ. पाटकर हायस्कुलमध्ये कॉम्प्युटर लॅबचा शुभारंभ..

⚡वेंगुर्ले ता.२९-: आपल्या शाळेची जाणीव ठेवून शाळते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी मुंबईचे माजी विद्यार्थी बापू गिरप यांनी कॉम्प्युटर लॅबची संकल्पना आपल्या बँच समोर मांडली अन बँचच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण फेडण्यासाठी हात दिले. याच बँचचा मी विद्यार्थी असून मला त्याचा शुभारंभ करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. याशाळेच्या अन्य बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या मातीशी, शाळेची नाती जपून या शाळते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणात सक्षम करण्यासाठी विविध स्वरूपांत सहकार्य करून आपले ऋण फेडावे असे आवाहन कार्यक्रमाचे उदघाटक रा. पां. जोशी यांनी केले.
येथील रा. कृ. पाटकर हायस्कूल आणि रा. सी. रेगे ज्युनिअर कॉलेज, तंत्र व व्यवसाय अभ्यासक्रम येथे सन १९६४ च्या १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी उपलब्द करून दिलेल्या ‘कॉम्प्युटर लॅब’ चे उदघाटन बॅचचे विद्यार्थी तथा स्कुलचे माजी मुख्याध्यापक रा. पां. जोशी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत कार्यक्रमाचे अध्यक्ष गोव्यातील माजी शिक्षण उपसंचालक शरदचंद्र रेडकर, माजी विद्यार्थी तथा गोरेगाव रोटरी क्लबच अध्यक्ष व सोशल सर्व्हस लिग पौलचे विश्वस्त बापू गिरप, उद्योजक पुष्कराज कोले, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य दिलीप गिरप, अँङ गंगाधर सबनीस, जिल्हा बैंकेचे सेवानिवृत्त शाखाव्यवस्थापक राजाराम राऊळ, सेवानिवृत्त दुकाने संस्था निरीक्षक किरण कुबल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईप्रसाद नाईक, निकॉम कॉम्प्युटरचे संचालक प्रशांत निकम, गोरेगांव स्कुलचे माजी मुख्याध्यापक मोहन गिते, पाटकर हायस्कुचे मुख्याध्यापक आत्माराम उर्फ दादा सोकटे यांचा समावेश होता.
सध्या सर्वत्र संगणकिय युग सुरू आहे. या आधुनिक युगात संगणक शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या ‘कॉम्प्युटर लॅब’ चा उपयोग करून आपली आधुनिक शिक्षणांत प्रगती साधावी. असे गोवा राज्यातील माजी शिक्षण संचालक शरदचंद्र रेडकर यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी उद्योजक पुष्कराज कोले यांनी आपली आई माया कोले यांच्या स्मरणार्थ शाळेचा ज्युबिलीहॉलचे नुतनीकरणाचे काम करून हॉल विविध कार्यक्रमांसाठी सुसज्ज करण्याचे आश्वासन दिले. तर गोरगांव रोटरी क्लबचे अध्यक्ष बापू गिरप यांनी या शाळेसाठी आपण आणखीही मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांची समायोजित भाषणे संपन्न झाली.
यावेळी माध्यमिक परीक्षेतून या स्कुलमधून प्रथम तीन क्रमांक पटकाविणारे भूषण विनोद चव्हाण, लिखित प्रल्हाद हळदणकर, करण लक्ष्मण करंगुटकर, तर उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा २०२४ मधून कला विभागातील सुजल भिकाजी गावडे, साहिल आत्माराम सावंत, देवेश सुरेंद्र परब, वाणिज्य विभागीतल- अपूर्वा अरुण पेडणेकर, कृपा शाम खोबरेकर, मयुरी दिलीप आरोलकर, व्यवसाय अभ्यासक्रम विभागीतील अनंत विश्वास पवार, रिया विठ्ठत डिचोलकर, फॅल्सी मिंगेल रॉड्रीग्ज, यांना माजी विद्यार्थ्यांकडून रु ५०० ३००, २००, शाळेकडून पेन व गुलाब पुष्प तसेच १२ वीच्या प्रत्येक विभागांत प्रथम आलेल्या व दहावीत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजक पुष्कराज कोले यांच्याकडून प्रत्येकी ५००/- रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.
यावेळी अन्य उपस्थित मान्यवरांत माजी विद्यार्थी विजय पांगम, विठ्ठल सावंत, रामचंद्र घोगळे, माजी मुख्याध्यापक सुरेश गावडे, वसंत तांडेल, रमाकांत आरावंदेकर, पालक संघाचे अध्यक्ष जयवंत मालंडकर, दाभोली मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, माजी विद्यार्थी बाबुराव खवणेकर, तुषार कामत, माजी कर्मचारी कमलाकांत सातार्डेकर यांस स्कुलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा. महेश बोवलेकर यांनी तर आभार मुख्याध्यापक आत्माराम उर्फ दादा सोकटे यांनी मानले.

You cannot copy content of this page