जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.२५-: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील बांदा, आंबोली व वेंगुर्ले मंडल अध्यक्षांच्या करण्यात आलेल्या निवडीला भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी स्थगिती दिली आहे. मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून ती स्थगिती उठवण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली.
दरम्यान, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये जरी संभ्रम पसरला असला तरी ते पत्र जुने आहे. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडून आम्ही वरिष्ठ स्तरावर याबाबत चर्चा करून ती स्थगिती उठविली आहे. त्यामुळे याबाबत निवड करण्यात आलेल्या अध्यक्षांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाहीत.
