खारेपाटण येथील तरुण बेपत्ता…

⚡कणकवली ता.१४-: खारेपाटण संभाजीनगर येथील अमोल अनंत गुरव (४०) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबतची खबर त्यांची आई अनिता अनंत गुरव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. अमोल गुरव हे १३ मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नी समवेत स्वतःच्या रिक्षेने बाजारात गेले होते. मात्र, रिक्षामध्येच बंद पडल्याने अमोल गुरव यांनी रिक्षा खारेपाटण मच्छीमार्केट येथे उभी करून ठेवली आणि ते घरी आले. अमोल गुरव हे आपल्या आई अनिता गुरव यांना रिक्षेचा ब्रेक डाऊन झाले असल्याने तिचे सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले. अमोल गुरव रात्री घरी न आल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. अमोल गुरव यांचा वर्ण निमगोरा, उंची ५ फुट ५ इंच, बांधा सडपातळ, केस काळे व डोक्यावर टक्कल पडलेले, चेहरा गोल, नाक सरळ, दाढी मिशी राखलेली काळी, उजव्या पायाचे अंठ्याजवळील बोट नाही, दोन्ही पायाच्या तळपायाला पुढील बाजूस जखमा आहेत, अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page