आडवली बौद्धवाडी येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय (सोलो) रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.१०-: बौध्द उत्कर्ष मंडळ व रमाबाई महिला मंडळ आडवली व मुंबई मंडळ आयोजित संयुक्त जयंती उत्सवा निमित्त जिल्हास्तरीय (सोलो) रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन १९ मे २०२४ रोजी आडवली बौद्धवाडी ता. मालवण येथे करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय (सोलो) रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये ७०००/- व चषक, व्दितीय क्रमांकास ५०००/- रुपये व चषक, आणि तृतीय क्रमांकास रोख रुपये ३०००/- व चषक अशी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावनोंदणी १५ मेपर्यंत निलेश कदम – मोबाईल नंबर- ९४२०८७५१२८, सचिन कदम- ९४०४२४३१४९, सुधीर कदम- ९४२३२११६९४, अतुल जाधव- ७५०७५०८४१७ यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करण्याचे आवाहन बौध्द उत्कर्ष मंडळ व रमाबाई महिला मंडळ आडवली व मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page