वारगाव येथे राणेंचा घरोघरी प्रचार…

⚡कणकवली ता.०३-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा वारगाव येथे महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे.


प्रचारात माजी जि. प. सदस्या रत्नप्रभा वळंजू, सरपंच नम्रता शेट्ये, उपसरपंच नाना शेट्ये, ग्रा. पं. सदस्य दिलीप नावळे, राजा जाधव, श्री. कुलकर्णी, कविता शेट्ये यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. वारगाव येथील धूमकवाडी, पवारवाडी, मांडवकरवाडी, धावडेवाडी येथे घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी राणेंचा प्रचार केला.

You cannot copy content of this page