पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूलचे यश

इयत्ता आठवीचे चार व पाचवीचा एक विद्यार्थी शहरी सर्वसाधारण विभागातून शिष्यवृत्तीसाठी पात्र

*💫सावंतवाडी दि.२६-:* पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूलने उज्वल यश संपादन केले असून प्रशालेचे इयत्ता आठवीचे चार व पाचवीचा एक विद्यार्थी शहरी सर्वसाधारण विभागातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. शहरी सर्वसाधारण विभागातून पाचवीतील गार्गी तारकेश सावंत २१६ गुण मिळवून जिल्ह्यात सतरावी आली. तर इयत्ता आठवीमधून शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत माहिका मिलिंद खानोलकर ३०० पैकी २४२ गुण प्राप्त करीत जिल्ह्यात चौथी आली. तसेच सेजल उषा पवार २२८ गुणांसहित जिल्ह्यात पाचवी, श्रृती जगदीश सावंत १९२ गुणांसहीत जिल्ह्यात सत्तावीसावी व गार्गी कमलेश शिरोडकर १८२ गुणांसह जिल्ह्यात त्रेचाळीसावी आली. पाचवीसाठी प्रशालेतर्फे अनिल सावळे, श्रुती मराठे, गोरेट्टी फर्नांडिस व श्रीकृष्ण कुडतरकर या शिक्षकांचे तर इयत्ता आठवीसाठी संगीता सावंत, श्रेया देसाई, व्हायलेट डिसोझा, अर्चना देसाई या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष अनंत ओटवणेकर नारायण देवरकर, सचिव व्ही. बी. नाईक, कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, मुख्याध्यापक समीर परब, मुख्य कार्यकारी अधिकारी शामराव माने, सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page