⚡ओरोस ता.२६-: गावराई सुकळवाड येथे प्रति वर्षाप्रमाणे साई मंदिर चा पंधरावा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित केला आहे ,या वर्धापन दिन सोहळा निमित्त साई पालखी , महिलांसाठी बहारदार खेळ पैठणीचा ,रेकॉर्ड डान्स ,रुद्राअभिषेक , रक्तदान , दशावतार ,सत्यनारायण महापूजा , आदींसह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई सेवा समितीचे संस्थापकीय सल्लागार शेखर वालावलकर यांनी केले आहे.
प्रति वर्षाप्रमाणे गावराई येथील साई मंदिर चा पंधरावा वर्धापन दिन सोहळा २८ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित केला आहे या सोहळ्यानिमित्त २१ ते २८ या कालावधी पर्यंत साई चरित्र पोथी वाचन पारायण आणि पंचक्रोशीतील विविध संगीत भजने कार्यक्रम पार पडली उदया२८ रोजी साई मंदिर येथून साई पालखीचा भव्य मिरवणूक कार्यक्रम आयोजन केले आहे साई मंदरि , महापुरुष , हनुमान मंदिर , वरचा नाका , ब्राह्मण देव मंदिर ते पुन्हा साई मंदिर अशी माऊली पाताळेश्वर ढोल पथक चेंदवन यांच्या ढोल गजरात भव्य मिरवणूक आकर्षक देखावे आहेत त्यानंतर सायंकाळी ७ .०५ वाजता दिपोत्सव महाआरती ७३० ते ९ महिलांसाठी बहारदार खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले आहे . रात्री ९ ते ११ स्थानिक मुलांसाठी आणि इच्छुकांसाठी खुले रेकॉर्ड डान्स होणार आहेत २९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ रुद्र अभिषेक दुपारी १२ आरती दुपारी ३ ते ६ नामस्मरण , सायंकाळी सात
७ ३०वाजता दीपोत्सव महारथी व त्यानंतर ८ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा मानसादेवी महिमा हा नाट्यप्रयोग होणार आहे ३० एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११.३०रक्तदान शिबिर , सकाळी १० सत्यनारायण महापूजा , दुपारी १२.३० व १ ते ३ महाप्रसाद , दुपारी २ ते ४ हळदीकुंकू , ४ ते६ नामस्मरण सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव महा आरतीसायंकाळी ७.३० ८ साई दिंडी रात्री८ ते १२.३० दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले यांचा महान ट्रिक्सन पौराणिक नाट्य प्रयोग पुत्र बक्षीती मांस आईचे निर्माण वृश्चिक राशीचे हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे .
तरी भाविक भक्तांनीं मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्यप्रयोगाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे सोबत [साईबाबा फोटो घेणे