दिपक केसरकर ; माजगावात कार्यकर्त्या मेळाव्यात विरोधकांवर निशाणा..
सावंतवाडी ता.२५-: आमची चार पिढ्यांची श्रीमंती आहे त्यामुळे आम्हाला खोंक्याची गरज नाही तुम्हाला जर पैसे कमी असतील तर आम्ही तुम्हाला देऊ असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
दरम्यान मला मिळालेले मंत्रिपद हे तुमचे आहे. तुमच्यासाठी आम्ही काम करतो. विकासासाठी एवढं निधी दिला. पण आम्ही केव्हाही नारळ फोडायला आलो नाही. त्यामुळे मला जसे प्रेम दिले तसेच प्रेम या निवडनुकीत राणेंना द्यावे असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले. ते माजगाव येथे आयोजि करण्यात आलेला जनसंपर्क यात्रा सभेमध्ये बोलत होते.