अन् चोरीस गेलेली दुचाकी सापडली…

कणकवली शहरातील घटना.

⚡कणकवली ता.२६-: शिवाजीनगर परिसरातील एका व्यक्तीच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी अल्पवयीन मुलाने चोरली. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात चोरट्याने सदर दुचाकी त्याठिकाणी ठेवून धूम ठोकली. दुचाकीचा संशय येताच ग्रामस्थांना गाडीचा नंबर सर्च केला. सदर दुचाकी कणकवली शहरातील एका व्यक्तीची असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित मालकास दुरध्वनीद्वारे कळवले. सदर दुचाकी त्याठिकाणी ठेवण्यास ग्रामस्थांना मालकाने सांगितले. घडलेल्या प्रकाराबाबत मालकाने पोलिसांना कळविले. विशेष म्हणजे मालकाने घरी लावताना चावी दुचाकी ठेवली होती. ही संधी साधून एका अल्पवयीन मुलाने दुचाकी चोरली.

You cannot copy content of this page