बांदा शाळा न.१च्या शुभ्रा तेलाची आकाशवाणीवर मुलाखत प्रसारित…

⚡बांदा ता.२५-: पी एम श्री जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेत इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या शुभ्रा सागर तेली हिची शाळेबाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत नागपूर आकाशवाणीवरून‌ मुलाखत प्रसारित झाली असून शुभ्राच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच प्रथम एज्युकेशन संस्थेच्या वतीने गेली तीन वर्षे विद्यार्थ्यासाठी थोडी मस्ती थोडा अभ्यास या उपक्रमांतर्गत शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम असून शुभ्रा व तिची आई सेजल यांची ५९५ व्या भागात माझा आवडता सण या विषयावर मुलाखत पार पडली होती. ही मुलाखत नुकतीच नागपूर आकाशवाणीवरून‌ राज्यभर प्रसारित झाली.
शुभ्राच्या या निवडीबद्दल मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्षा संपदा सिध्दये, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे.

शुभ्राला वर्गशिक्षक जे. डी. पाटील, मनिषा मोरे, पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी, रसिका मालवणकर, शांताराम असनकर, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, सपना गायकवाड, फ्रान्सिस फर्नांडिस, सुजाता सावंत, स्नेहा कदम यांचे मार्गदर्शन लाभले. शुभ्राच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो :-
शुभ्रा तेली.

You cannot copy content of this page