नरेंद्र सावंत यांच्या घरातील 14 तोळ्याच्या सोन्याचे दागिने केले लंपास..
कणकवली ः शहरातील परबवाडी येथील नरेंद्र रामचंद्र सावंत यांच्या घरातील बेडरूममधील बेडमध्ये ठेवलेले 14 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केली. ही घटना गुरुवारी उघडकीस अाली. कणकवली परिसरात चौथ्या दिवशी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली अाहे. नरेंद्र सावंत यांच्या घरात 18 ते 24 एप्रिलदरम्यान बेडमध्ये ठेवलेल्या 8 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, 4 तोळ्याचा सोन्याचा हार, 13 ग्रॅमची सोन्याची चैन, 2.5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 4 ग्रॅमची कानातील कुंडी व एक सोन्याची नथ असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी संधी साधून नरेंद्र सावंत यांच्या घरात हातसफाई केली. नरेंद्र सावंत यांनी एक सोन्याची वस्तू तयार केली होती. ती वस्तू बेडरूममधील बेड येथे ठेवण्यास गेले असता त्याठिकाणी ठेवलेले दागिने त्यांना न दिसल्याने त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, चोरीच्याप्रकरणात पोलिसांनी अाजूबाजूच्या राहणाऱ्या काही जणांचा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले होते.