परशुराम उपरकर यांचा आरोप: लवकरच यासंदर्भात आंदोलन उभारणार..
⚡सावंतवाडी ता.२५-: इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झालेल्या पडवे माजगाव सारख्या गावात महसूलच्या कृपा आशीर्वादाने मायनिंग उत्खनन सुरू आहे. हा हा न्यायालयाचा अवमान आहे यामध्ये महसूल चे हात ओले झाले आहेत, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर्णी आज येथे केला. दरम्यान येणाऱ्या काळात या संदर्भात आपण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील श्री उपरकर यांनी यावेळी दिला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषद बोलत होते.