राणेंनी केलेला स्मगलिंगचा आरोप केसरकर विसरले का…?

परशुराम उपरकर: केसरकर भाजपमध्ये प्रवेश करून चौथी हॅट्रिक करतील…

⚡सावंतवाडी ता.२६-: नारायण राणे यांचे गोडवे गाणारे केसरकर यांनी त्यावेळी राणेंनी केलेला स्मगलिंग आरोप विसरले का..? व तो केलेला आरोप खरा होता की खोटा हे केसरकरांनी किंवा राणेंनी जनतेला सांगावे अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली.दरम्यान केसरकर हे इकडून तिकडून उडी मारण्यात पटाईत आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदललेत त्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करून ते हॅट्रिक करतील असा टोला देखील श्री.उपरकर यांनी यावेळी लगावला ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी आशिष सुभेदार मंदार नाईक नाना सावंत बाळा बहिरे आदेश सावंत विजय जांभळे धनेश नाईक चंद्रशेखर उपरकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page