कणकवली ता.२५-: देवगड तालुक्यातील शिरगाव धोपटेवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख किरण गोठणकर व गौरी गोठणकर यांनी अोम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. किरण गोठणकर व गौरी गोठणकर यांचे नीतेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नंदू देसाई, प्रदीप देसाई, शशिकांत गोठणकर, पिंटू लाड गावकर,उमेश गोठणकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन आणि केंद्रीयमंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी गोठणकर कुटुंबीयांनी भाजपात पक्ष प्रवेश केला.