कणकवलीत 18 मे रोजी गझल लेखन व गायन मार्गदर्शन कार्यशाळा…

⚡कणकवली ता.२६-: गझल सागर प्रतिष्ठान , मुंबई आणि अखंड लोकमंच कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार 18 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत कणकवली नगरवचनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात गझल लेखन व गझल गायन मार्गदर्शक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेत गझल नवाज भीमराव पांचाळे हे मार्गदर्शन करतील.

याशिवाय पांचाळे हे गझल लेखनाच्या आकृतीबंधाबद्दल प्राथमिक स्वरूपाचे धडे देणार आहेत. या कार्यशाळेला ज्येष्ठ गझलकार श्री देविदास पाटील हे देखील मार्गदर्शक म्हणून हजर राहणार आहेत. कणकवली परिसरातील गझल लेखन आणि गायनामध्ये रुची असणाऱ्या इच्छुकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे शैलजा कदम (8805292596), विनायक सापळे (9404940217) यांच्याकडे नोंदवावित, असे आवाहन अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page