⚡कणकवली ता.२५-: येथील विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कलाकौशल्याचे धडे दिले जात आहेत. कलाकौल्यश उपक्रमांर्गत विद्यार्थ्यांना कला शिक्षक प्रसाद राणे यांनी मातीच्या मूर्तीकलेचे प्रशिक्षण दिले.
या मूर्ती कला प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी सुंदर अशा मूर्त्या तयार केल्या. त्यांचे प्रदर्शन ही भरविले जाणार आहे.
या उपक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कौतुक केले. आज पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवनात स्थिर होणाऱ्या जीवन शिक्षणाची गरज आहे. ही काळाची गरज ओळखून मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी विविध प्रशिक्षणांची शिबिरे प्रशालेत आयोजित केली आहेत. या शिबिरांचा उपयोग विद्यार्थांना निश्चितपणे त्यांच्या व्यक्तीमत्वाला आकार देण्यासाठी होत आहे.