कणकवली ः कणकवली शहरापासून जवळाच्या असलेल्या कलमठ – गुरववाडी येथील रुपेश मारूती जाधव (41) यांच्या घरात घुसून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरासमोर लावलेली 84 हजार रुपये किमतीची टिव्हीएस स्पोर्ट्स दुाााकी चोरून नेली. ही घटना बुधवारी सकाळी 6 वा. सुमारास उघडकीस आली. चोरीप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. कणकवली परिसरात सलग तिसर्या दिवशी घडफोडी झाली असल्याने नागरिकांमध्येही घबराहट पसरली आहे.
घरात माणसे असताना चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. रुपेश जाधव व त्यांच्या भाऊ आपापल्या बेडरूममध्ये झोपले असताना चोरट्यांनी बेडरूमला कडी लावली. त्यानंतर चोरट्यांनी घरातील खुंटीला लावलेली चावी घेऊन दुाााकी चोरली. यावेळी तेथील आणखी एक दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचमाना केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
मंगळवारी शहरातील विद्यानगर येथील बंद असलेला फ्लॅट चोरट्यांनी फोडून 15 हजार रुपयांचे रोकड व 60 हजार रुपयांची सोन्याची चैन असा 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्यााया दुसर्यााा दिवशी कणकवली परिसराताा पुन्हा एकदा चोरी झाली आहे. अर्थात चोरटे सक्रीय झाल्याने नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे.