कणकवली ः कणकवली-बांधकरवाडी येथील चेतन दिलीप पवार (वय 25) व त्यांच्यासोबत असलेले सुनील चव्हाण यांच्यावर शासकीय ठेकेदारीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला होता. हा प्रकार रविवार 10 मार्चला रात्री 8 वाजता घडला होता. या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेल्या 3 चारचाकी गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
त्यामध्ये एक बोलेरो, एक स्विफ्ट कार आणि एक टाटा नेक्सन या गाड्यांचा समावेश आहे. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला असता लाठया, काठया ताब्यात घेतल्या होत्या. या हल्ल्यातील संशयित आरोपी रणजीत जाधव, लक्ष्मण सुळ (रा. वळीवंडे, ता. देवगड) यांच्यासह 8 ते 9 जणांविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत असून अद्यापही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले नाही. याबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.