⚡कणकवली ता.२१-: डामरे ग्रामपंचायतीच्या शिवसेना उबाठा गटाचे सदस्य रघू जाधव यांनी समर्थकांसह अामदार नीतेश राणे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. नीतेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव यांनी ओम गणेश निवासस्थानी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच किरण कानडे, उपसरपंच सागर साटम, ग्रा. पं. सदस्य संतोष मेजरी, माजी सरपंच चंद्रहास उर्फ बबलू सावंत, संदीप साटम, सुमित मेजारी, प्रथमेश दळवी आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
