जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे विरोधकांना जाहिर आवाहन
*💫सावंतवाडी दि.२६-:* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढती संघटना पाहून अनेक भाजपचे पदाधिकारी त्रास देत असून पोलीस केस दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकातरी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून दाखवावाच असे आवाहन आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता हा संघर्षातून निर्माण झाला असून तो अशा धमक्यांना भिऊन जाणारा नाही. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीर पणे उभा असून, त्यांना त्यांच्याच पद्धतीत उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सावंतवाडीकराना कळून चुकले आहे की त्यांनी चुकीच्या व्यक्तीला त्या पदावर बसवले असल्याचे आणि त्यामुळे भविष्यात ते अशी चूक करणार नसून. अन्याय होणाऱ्या प्रत्येकाच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीर पणे उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.