अजय सावंत व अमित परब धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला…

इन्सुल येथे चारचाकी गाडीला घडला अपघात: जखमी मुलांना केले रुग्णालयात दाखल..

⚡सावंतवाडी ता.३०-: अजय सावंत व अमित परब हे दोघे ही सावंतवाडीच्या दिशेने येत असताना इन्सुली येथे रस्ते अपघातात जखमीला मदत करून आदर्श घालून दिला.

श्री सावंत व श्री परब हे सकाळी बांद्याहून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना इन्सुली येते चारचाकी गाडी अपघातात जखमी झालेल्या आणि मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या छोट्या मुलांना आपल्या गाडी थांबून स्वतः खाली उतरून श्री सावंत व श्री परब यांनी मदत केली. या अपघातग्रस्त मुलांना आपल्या गाडीतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे श्री सावंत व श्री परब यांनी अपघातग्रस्तांना मदत करून एक आदर्श उदाहरण घालून दिले.

You cannot copy content of this page