बॅ. नाथ पै शिक्षण संस्था , कुडाळ पोलीस व पत्रकार संघाचा पुढाकार २६ नोव्हेंबर ला आयोजन
कुडाळ दि.२५-:* बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलिस ठाणे व कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.१५ वाजता दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच निष्पाप नागरिक यांना पोलीस अधीक्षक मान.श्री.राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच निष्पाप नागरिक शहीद झाले. या सर्वांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणात शहीद स्तंभ उभारून त्यांस पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येते.अशी माहिती कुडाळ येथील बँ नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. तरी देशप्रेमी नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री.उमेश सु. गाळवणकर, ध्येय प्रतिष्ठान चे अध्यक्ष मान.श्री. अमित सामंत व कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विजय पालकर यांनी केले आहे.