आंबोली मुख्य घाटापासून ते आजरा फाटा येथे अनधिकृत बांधकामे, हॉटेल तात्काळ काढून टाकावी…

अमित परब: ४८ तासात कारवाई न झाल्यास बांधकाम कार्यालयासमोर उपोषण..

सावंतवाडी : आंबोली मुख्य घाटापासून ते आजरा फाटा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक अनधिकृत बांधकामे, हॉटेल असून ती तात्काळ काढून टाकण्यात यावी अशी मागणी अमित परब यांनी केली आहे.

ते म्हणाले, या बांधकांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे येत्या ४८ तासात योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल याची असा इशारा चराठा उपसरपंच अमित परब यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंतांना दिला आहे.

You cannot copy content of this page