धान्यांपासून वंचित राहिलेल्यासाठी माजी पं. स सदस्य बाळा शिरसाठ यांचे उपोषण…

तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनाअंती उपोषण मागे..

सावंतवाडी
शिधापत्रिकेवर नाव असूनही तालुक्यातील कित्येकजण रेशन धान्यापासून अनेक वर्ष वंचित आहे शासनाच्या या कार्यपध्दतीच्या निषेधार्य माजी पंचायत समिती सदस्य सिताराम उर्फ बाळासाहेब यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडले. दरम्यान या संदर्भात नोंदणी घालण्याच्या काम वंचित लाभार्थ्यांनाही धान्याचा लाभ मिळणार असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर श्री शिरसाठ यांनी उपोषण मागे घेतले.

श्री शिरसाट यांनी यासंदर्भात तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की सावंतवाडी तालुक्यातील कित्येक जण शिधापत्रिकेवर नाव असून सुद्धा शासनाच्या नियमित धान्यापासून वंचित आहेत गेले कित्येक वर्ष असे लोक धान्याच्या प्रतीक्षेत आहेत परंतु वेळोवेळी आवाज उठवूनही किंवा मागणी करूनही केवळ त्यांना धान्य मिळत नसल्याने प्रचंड नाराजी आहे यासंदर्भात जिल्हा पातळी वर लक्ष वेधूनही केवळ अधिकारी वर्ग शासनाच्या नियमावलीवर बोट ठेवून वेळ मारून नेत आहेत धान्य कोटा कमी असल्याचे ते कारणे देत आहेत परंतु मुंबईसारख्या ठिकाणी दोन महिन्यात पूर्वी शिधापत्रिका बनवल्यानंतरही त्यांना शासनाचा नियमित धान्य पुरवठा लागू होतो मग महाराष्ट्रात राहूनही या ठिकाणी वेगळा नियम का असा सवाल त्यांनी यामध्ये उपस्थित केला आहे.
त्यामुळे जे धान्यापासून वंचित आहे अशांना धान्य मिळावे यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री शिरसाठ यांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. दरम्यान वंचित राहिलेल्या लोकांच्या नोंदणी घालण्याचे काम सुरू आहे त्यामुळे अजून बरेच जणांना शिधापत्रिकेनुसार धान्याचा लाभ मिळणार आहे असे लेखी पत्र तहसीलदार यांनी उपोषण करते शिरसाठ यांना दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
या उपोषणाला माझी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांच्यासह माडखोल माजी सरपंच संजय लाड, निलेश सावंत तिरोडा,दीप्ती राऊळ वेर्ले, चंद्रकांत राऊळ माडखोल, सुनिधी कालवणकर न्हावेली, वासुदेव होडवडेकर,सुरेंद्र बांदेकर, संतोष गावडे,मनोहर राऊळ आदींनी पाठींबा दर्शविला आहे.

You cannot copy content of this page