चौघेजण जखमी: अधिक उपचारासाठी सावंतवाडीत हलविण्यात आले.
⚡वेंगुर्ले ता.२६-: दोन दुचाकी गाड्यांमध्ये काल रात्री मातोंड रस्त्यावर सामोरासमोर झालेल्या अपघातामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. या अपघाता बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात मात्र अद्याप पर्यंत कोणतीही नोंद करण्यात आली नाही.
सोनुर्ली येथून तिळबा जाधव हे आपल्या प्लेटीना दुचाकी क्रमांक एम एच ०७ वाय ०९८८ याने मातोंड येथे उत्सवासाठी जात होते. यावेळी त्यांच्या गाडीवर लकी जाधव आणि साईल जाधव हे मागे बसले होते.
तर त्याच दरम्यान विवेक भैरे हा आपली एक्टिवा क्रमांक एम एच ०७ झेड ३३२५ या गाडीने मातोंड येथून घरी तळवडे येथे निघाला होता. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मातोंड वळणावर या दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातात चौघेही जखमी झाले. यातील विवेक याला उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले.
तर अन्य तिघांना सावंतवाडी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
