⚡सिंधुदुर्ग दि.२५-: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्गा मधून महायुतीकडून अद्यापही निश्चित उमेदवार जाहीर झाली नसली तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत आहे. खुद्द मंत्री राणे यांनी खासदारकी न लढवण्याचे म्हटले असले तरी कार्यकर्ते हितचिंतक आणि पक्षाकडून त्यांच्या नावालाच पसंती आहे दोन्ही जिल्ह्याचा विचार करता त्यांना उमेदवारी मिळाल्यास नक्कीच त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू असा विश्वास पदाधिकारी कार्यकर्ते व कोकणी जनतेकडून सुरू आहे.
नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात काम करताना कोकणाचा विकासात्मक ऊर्जा मिळवून दिली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने कोकण विकासाच्या दिशेने नेले आहे.त्यामुळे ज्या नेत्याने कोकणचे नाव उज्वल केले अशा नेत्याला उमेदवारी मिळावी अशी आम्हा कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राणे यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही दिवस-रात्र एक करून त्यांचा प्रचार करू व त्यांना निवडून आणू अशी ही चर्चा सध्या कार्यकर्त्यांसह कोकणी जनतेमधून होऊ लागली आहे.
