असनिये घारपी मार्गावर अपघात
मंजूर रस्त्याचे काम तात्काळ चालू करा ,अन्यथा तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा
⚡बांदा ता.२४-: बांदा घारपी एसटी बसने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात तीन गाड्यांचे नुकसान बांदा घारपी रस्त्यावर असनिये भटवाडी येथे आज दुपारी शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या बसने ठोकर दिल्याने तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यात दोन दुचाकी तसेच एका चार चाकी वाहनाचा समावेश असून सदर अपघाताचा पंचनामा बांदा पोलिसांकडून करण्यात आला यावेळी बांदा पोलीस विक्रम गवस असनिये पोलीस पाटील विनायक कोळपे एसटी अधिकारी विश्वजीत भोसले एसटी चालक रामा तारी वाहक राजन कोकरे निलेश पोकळे राकेश सावंत दीपक सावंत अक्षय सावंत समीर कोलते संदीप ठीकार मुरलीधर ठीकार महेश पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते
असनिये घारपी रस्ता हा पूर्णपणे नातुरुस्त असून रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच भले मोठे दगड असल्यामुळे
अपघात होत आहेत
सदर रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अशा अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे याबाबत असनिये तसेच घारपी सरपंच ग्रामस्थांनी वारंवार आवाज उठवून सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करून देखील प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे असनिये घारपी जीर्ण रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे सदर रस्ता हा वरदळीचा असून घारपी येथील शाळेत शिकणारी मुले या रस्त्यावरून रोज प्रवास करतात त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असनिये सरपंच सौ रेशमा सावंत यांनी दिला आहे
