आम.नितेश राणे यांच्या शिफारस ;दळणवळणाची गैरसोय दूर होणार..
⚡कणकवली ता.२४-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 नाबार्ड अर्थसहाय्यमधून आम.नितेश राणे यांच्या शिफारशीने देवगड व वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 कोटी 37 लाख रक्कमेच्या पुलांच्या २ कामांना मंजुरी मिळाली आहे.
स्थानिक ग्रामस्थांकडून या कामांची वारंवार मागणी होत होती. सदर कामांना मंजुरी मिळाल्याने जनतेची होणारी दळणवळणाची गैरसोय दूर झाली असून जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.फणसगाव महाळुंगे गढीताम्हाणे वळीवंडे रस्ता साखळी क्रमांक 4/200 वर पुलाचे बांधकाम करणे. (रुपये 11 कोटी 54 लाख)तसेच सांगुळवाडी फाटकवाडी रस्ता साखळी क्रमांक 3/100 वर पुलाचे बांधकाम करणे. (रुपये 1 कोटी 83 लाख) या कामांना मंजुरी मिळाली आहे.
