त्रिंबक येथील रामेश्वर मंदिर जिर्णोद्धार, कलशारोहण सोहळा २६ फेब्रूवारी पासून…

⚡मालवण ता.२३-: मालवण तालुक्यातील त्रिंबक गावची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण व लोकार्पण सोहळा २६ फेब्रूवारीपासून सुरू होत आहे. १ मार्च पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जिर्णोद्धार समिती कडून करण्यात आले आहे.

यात सोमवार २६फेब्रूवारी रोजी सकाळी ९वाजता कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्रौ ८ वाजल्यापासून स्थानिक भजने . मंगळवार २७ फेब्रूवारी रोजी सकाळी सात पासून धार्मिक विधी सुरू. दुपारी २ वाजता महाप्रसाद. रात्रौ सात वाजता सुस्वर भजने, सांस्कृतिक कार्यक्रम रात्री १०वाजता दशावतारी नाट्य प्रयोग. बुधवार दि २८ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून धार्मिक विधी होम यज्ञ, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सात नंतर सुस्वर भजने, रात्रौ १० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना, गुरुवार दि २९फेब्रूवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून धार्मिक विधी, कलशारोहण सोहळा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी पाच वाजता सत्कार सोहळा , रात्री ९वा दिंडी गोफ नृत्य कार्यक्रम. शुक्रवार १ मार्च रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा , सायंकाळी भजने रात्री ट्रिक सीनदशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन जिर्णोद्धार समिती अध्यक्ष रघुवीर घाडीगांवकर, सचिव सीताराम घाडीगांवकर, खजिनदार संतोष घाडीगांवकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page