जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत तेजस्वी मेस्त्री प्रथम…

⚡मालवण ता.२२-: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा, ता. मालवण या शाळेची विद्यार्थीनी तेजस्वी आनंद मेस्त्री हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत ओरोस येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभात तेजस्वी हिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रुपये २१ हजार असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तेजस्वी आनंद मेस्त्री हिचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी वडाचापाट केंद्राचे केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी, नवनाथ भोळे, श्री. चौधरी, सौ. मालंडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद कबरे, मुख्याध्यापक प्रशांत पारकर व शिक्षक उपस्थित होते. तेजस्वी मेस्त्री हिच्या या यशाबद्दल मालवण तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, सरपंच सुरेखा वायंगणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद कबरे, मुख्याध्यापक प्रशांत पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page