वायंगणी येथे २४ व २५ रोजी कासव महोत्सव…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्यातर्फे वायंगणी समुद्रकिना-यावर २४ व २५ फेब्रुवारी दरम्यान ‘कासव महोत्सव वायंगणी २०२४‘चे आयोजन केले आहे.

  २४ रोजी सकाळी ७.१५ वा. नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या हस्ते नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे, ७.४५ वा. कासव महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते वाळू शिल्पातील कासवाच्या प्रतिकृतीचे फित कापून उद्घाटन, ८.१५ वा. सावंतवाडी उपवनसंरक्षक एस.एन.रेड्डी यांचे प्रास्ताविक, ८.३० वा. कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे स्थानिक लोकसहभागातून कासव संवर्धनावर मार्गदर्शन, ९ वा. कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणा-या कासव मित्रांचे प्रमाणपत्र देऊन सन्मान, १० वा. मान्यवरांचे मनोगत, १०.३० वा. कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शनपर चित्रफित, ११.३० वा. मानद वन्यजीव रक्षक नागेश दफ्तरदार यांचे कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन, दुपारी ३ वा. परिसंवाद व क्षेत्रभेट, सायं. ५.३० वा. वेंगुर्ला सूर्यास्त दर्शन, ७.३० वा. ‘कुर्म अवतार‘ पौराणिक दशावतार नाटक,

  दि.२५ रोजी सकाळी ७ वा. समुद्री कासव पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे, ८ वा. वायंगणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिम, ८.३० वा. मांडवी खाडी व निवती खाडी येथे कांदळवन सफारी, ११.३० वा. कांदळवन संवर्धन मार्गदर्शन, दु. ३ वा. किल्ले निवती भ्रमंती, ६ वा. कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
You cannot copy content of this page