सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या मैदानावरखवय्यांनी लुटला खाद्यमहोत्सवाचा आनंद…

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे आणि सेंट्रल इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांचे पालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली खाद्यमहोत्सव स्पर्धा दिनांक 17 फेब्रुवारी 2024 सेंट्रल इंग्लिश स्कूल प्रशालेच्या मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेचे उदघाटन खाद्यमहोत्सवाला भेट देण्यासाठी प्रथम आलेल्या २५ पालकांपैकी लकी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या पालक श्रीम. नाजमीन नदाफ यांच्या हस्ते झाले .


या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या पालकांचे १९ स्टॉल आणि प्रशालेतील विद्यार्थी गटाचे ७ स्टॉल लावण्यात आले होते .
या खाद्यमहोत्सवाला खव्वयांसाठी व्हेज – नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी होती.पालकांमध्ये श्रीम. वहिदा शेंडेवाले ,
श्रीम. शबनम अन्सारी , श्रीम. अन्सरीन मकानदार, श्रीम. मुमताज बंगलेकर , श्रीम. मयुरी नेरुरकर ,
श्रीम . प्रज्ञा परुळेकर, श्रीम. निकिता साटेलकर , श्रीम. फरझाना नाईक , श्रीम. अल्फिया पटेल , श्रीम. किर्ती जाधव, श्रीम. अमिना शेख , श्रीम .
साजिया पडवेकर , श्रीम. फरहीन खान , श्रीम. आसिया शेख , श्रीम .नाज्मा शेख , श्रीम. नाजिया शेख , श्रीम. त्रिवेणी शिरसाट , श्रीम. शबाना शेख , श्रीम. गौरवी साटेलकर हे स्पर्धक तर , विद्यार्थ्यामध्ये इ. ६ वी , ८वी आणि ९ वी तील विद्यार्थ्यांचे प्रत्येकी २ गट आणि ७ वी तील विद्यार्थ्यांचा १ गट स्पर्धेत सहभागी झाले. तसेच इ. ६ वी विद्यार्थी गटातून फनी गेमचा एक स्टॉल लावण्यात आलेला .
प्रशालेने आयोजित केलेल्या खाद्यमहोत्सव स्पर्धा २०२३ – २४ मध्ये विद्यार्थी गटातून इयत्ता ९ वी चा गट व पालक गटातून श्रीम. प्रज्ञा परुळेकर विजेत्या ठरल्या . त्यांना प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते . सर्वांनी पालक व विद्यार्थी गटातील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे . या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले . या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरावरून भरभरून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page