मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे बबन शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡मालवण ता.२०-: मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी १९ लाख ९५ हजार ९०७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख पराग खोत, मालवण शहरप्रमुख बाळू नाटेकर, सुकळवाड जि.प. विभाग प्रमुख अल्पेश निकम, चाफेखोल सरपंच सौ. रविना घाडीगावकर, उपसरपंच रविंद्र जाधव, पोईप शाखाप्रमुख नारायण राणे, चाफेखोल ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशाली गावडे, पूनम घाडीगांवकर, उमेश घाडीगांवकर, ग्रामसेविका सौ. स्वाती कदम, शिवाजी पडवळ, काशिराम घाडीगांवकर, विलास पताने, दीपक कदम, संजय देसाई, सरोज बावळेकर, यशवंत घाडीगांवकर, हरीचंद्र इंदुलकर, प्रभाकर इंदुलकर, शशिकांत घाडीगांवकर सचिन घाडीगांवकर, विशाखा पताने, संतोष निकम आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page