भटवाडी येथील कु. स्वानंदी गावकर हीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात…

⚡सावंतावडी ता.२०-: स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या भटवाडी येथील कु. स्वानंदी गावकर या विद्यार्थिनीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात देत तिला आर्थिक मदत केली.


कुमारी स्वानंदी दशरथ गावकर (16) भटवाडी येथे आपल्या परिवारासोबत भाड्याच्या घरामध्ये राहत असून वि. स खांडेकर विद्यालयामध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिकत आहे. ती हुशार विद्यार्थिनी आहे, परंतु सध्या ती स्वादुपिंड्याच्या आजाराने त्रस्त झाली आहे. तिच्या उपचारासाठी जवळपास दोन लाख इतका खर्च आहे. तिचे वडील मोल मजुरी करतात. मुलीचे आजारपण व घरचा खर्च भागवणे त्यांना कठीण होत आहे. वि. स खांडेकर शाळेच्या शिक्षकांनी देखील तिच्या उपचारासाठी हातभार लावलेला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेऊन सदर मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. आम्ही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आव्हान करत आहोत. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, शरद पेडणेकर, शामराव हळदणकर, अशोक पेडणेकर, रवी जाधव व वि. स खांडेकर शाळेची धुमाळे सर उपस्थित होते. सदर मुलीचा जॉईंट अकाउंट नंबर खालील प्रमाणे आहे. स्वानंदी दशरथ गावकर सिद्धी दशरथ गावकर Ac/3992996509 lFSC CBIN 0283536 सेंट्रल बँक ऑफ इंडिया सावंतवाडी मो. नंबर 8055728695

You cannot copy content of this page