⚡कणकवली ता.२०-: पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली संघटनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजासाठी सामाजिक न्याय व क्रीडा विभाग 2 जून 2004 च्या शासन निर्णयात शुद्धिपत्र आणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज आदिवासी असल्याबाबत आदेश निर्गमित करणे. तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील अनुसूचित जमातींचे जात पडताळणी समिती सिंधुदुर्गमध्ये होण्यासाठी मागणी केलेली आहे.
दोन्ही मागण्या अगदी रास्त असल्याचे आम. नितेश राणे यांनी सांगत आपण स्वतः चार दिवसात मंत्रालय, मुंबईमध्ये संबंधित सर्व मंत्री आणि अधिकारी यांची तात्काळ सभा लावून पंचक्रोशी ठाकर समाजाच्या चार सदस्यांना निमंत्रित केलेले आहे. आपण या दोन्ही मागण्यांचा शासन निर्णय तात्काळ काढू अशी ग्वाही दिलेली आहे. समाजाच्यावतीने आम. नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.
तसेच आजच्या या मागणीसाठी कणकवली तालुक्यातील पंचक्रोशी ठाकर समाजाचे अमित ठाकूर ,समीर ठाकूर, सुहास ठाकूर, दिगंबर गवाणकर, राजेश गंगावणे, सचिन ठाकूर, राजन रणसिंग, निलेश गंगावणे मनोजकुमार आटक,स्वप्निल गंगावणे , मदन ठाकूर ,पंकज ठाकूर, केदार ठाकूर, रोहित ठाकूर ,अविराज मराठे, प्रशांत मराठे, संतोष मराठे, सच्चिदानंद ठाकूर, सुरेश ठाकूर ,रामदास ठाकूर, रामजी ठाकूर, मयूर ठाकूर आदी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
