विनायक राऊत यांचा टोला:तर किरण सामंत देखील तोंड दाखवायला शिल्लक राहणार नाही..
⚡सावंतवाडी ता.२०-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माझ्या विरोधात जर निवडणूक लढायची असेल तर त्यांनी नक्कीच लढवावी व त्यांनी पराभव स्वीकारावा असा टोला खासदार विनायक राऊत यांनी आज येथे लगावला. दरम्यान किरण सामंत हे जरी माझ्या विरोधा उभे राहिले तर त्यांचा देखील पराभव होऊन तोंड दाखवायला ते शिल्क राहणार नाही असा टोला देखील सामंत यांना राऊत यांनी यावेळी लगावला.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषद बोलत होते. खासदार विनायक राऊत पुढे बोलताना म्हणाले की आमच्याकडे जरी पैसा नसला तरी आमच्याकडे जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रेम आहे त्यामुळे आमचा नक्की विजय आहे असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.
