उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡मालवण ता.१९-: ढोल ताशांचा गजर… शिवसैनिकांचा अपूर्व उत्साह आणि जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सकाळी किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील एकमेव शिवराजेश्वर मंदिरात महाराजांना अभिवादन केले. यावेळी मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ यांच्या हस्ते आमदार नाईक यांचा मानाची शाल देऊन सत्कार करण्यात आला.

मालवण बंदर जेटीवरून वाजत गाजत मिरवणूक काढत आमदार वैभव नाईक यांचे किल्ले सिंधुदुर्गवर आगमन झाले. यानंतर शिवराजेश्वर मंदिरात जाऊन शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, उमेश मांजरेकर, मनोज मोंडकर, सरपंच भगवान लुडबे, सन्मेष परब, यशवंत गावकर, भाई कासवकर, हेमंत मोंडकर, किशोर गावकर, सिद्धेश मांजरेकर, अक्षय भोसले, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, निनाक्षी मेथर, आर्या गावकर, वायरी ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रभू यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page