मडुरा पंचक्रोशीत शिवजयंती उत्साहात साजरी…

पाडलोस, मडुरामध्ये भव्य मिरवणूक : परिसर व्यापला भगव्या रंगाने..

बांदा ता.१९-: साऊंडद्वारे ढोल, ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन मडुरा पंचक्रोशीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून सोमवारी पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, निगुडे, कास, सातोसे गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शिवप्रेमी, ग्रामस्थांनी मिरवणुका काढून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. पाडलोस व्हाट्सएप गाव ग्रुप आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे गावाला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते.

पाडलोस ग्रामपंचायत येथे कार्यक्रमास व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर (गुरुजी), पाडलोस सहकारी सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब, सरपंच सलोनी पेडणेकर, पाडलोस बचतगट ग्रामसंघ कोषाध्यक्ष मयुरी कुबल, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, पाडलोस व्हाट्सएप गाव ग्रुप अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, पाडलोस शाळा नं.1 मुख्याध्यापक अनिल वरक, सहशिक्षक राहुल वाघधरे आदी मान्यवर उपस्थित होते. पाडलोस ग्रामपंचायत येथे गावातील महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन उपसरपंच राजू शेटकर यांनी केले. रोहित गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page