कणकवली ता.१९-: दारिस्ते गावच्या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर , कणकवली विधानसभा संघटक सचिन सावंत , शिवसेना
कणकवली तालुकाप्रमुख
डॉ. प्रथमेश सावंत ,युवासेना जिल्हा समनवयक राजू राठोड,युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुका प्रमुख हेमंत सावंत, शिवसेना शाखा अध्यक्ष अविनाश गावकर, युवासेना शाखा प्रमुख विजय गावकर , मा. सरपंच केशव मेस्त्री, दीपक मेस्त्री, विलास सावंत , श्रीराम गुरव, आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गावचा प्रथम क्रमांक लागला असून येणाऱ्या काळात विकास कामे आपल्या हातून आमच्या गावामध्ये होवोत अशा भावना ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्याजवळ व्यक्त केल्या.
दारिस्ते गावच्या मुख्य रस्त्याचे खास. विनायक राऊत यांनी केले भूमिपूजन…
