मुंबईस्थित कुडाळ- मालवणवासीयांची २१ रोजी शिवसेना भवनात बैठक…

⚡मालवण ता.१७-: शिवसेना ठाकरे गटातर्फे कुडाळ-मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले चाकरमानी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला शिवसेना उपनेते अरुण दूधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर व संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश पाटील, कुडाळ संपर्कप्रमुख बाळा म्हाडगूत, महिला विधानसभा संपर्कप्रमुख अपूर्वा प्रभू हे मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई आदी भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ- मालवणवासीयांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहवे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्वीय सहाय्यक अनंत पाटकर (९०११९९५५०३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page