मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती…

काही निवडक ऐतिहासिक दस्तावेजाचे मांडण्यात येणार प्रदर्शन..

⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी येथील ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी काही निवडक ऐतिहासिक दस्तावेजाचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.


शिवजयंतीचे यंदाचे हे ५ वे वर्ष आहे. यावेळी मनुचीने काढलेली छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे काही फोटो प्रदर्शन, अफजलखानाच्या शिक्केतील मजकुर, वाघनखे शस्त्र (प्रतिकृती), शिवराई चलन, शिवकालीन काही ऐतिहासिक पत्रे, अस्सल संदर्भासहीत शिवचरीत्र व इतर पुस्तके, मराठ्यांचे एक लढावू शस्त्र प्रतिकृती, अस्सल राजमुद्रा, काही अस्सल शिवकालीन फर्माने व कट्यार (प्रतिकृती) आदी ऐतिहासिक दस्तवेजांचे प्रदर्शन राणे यांच्या निवासस्थानी मांडण्यात येणार आहे. मळगाव व पंचक्रोशीतील शिवभक्तांना व शिवप्रेमींना एक वेगळीच पर्वणी पाहायला मिळणार असल्याने शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page