उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सावंतवाडी ठाकरें सेना सज्ज…

सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांनी सावंतवाडीत सभास्थळाची केली पहाणी: उद्धव ठाकरे काय बोलणार..?; याची उत्सुकता आता सावंतवाडीकरांना..

⚡सावंतवाडी ता ०३-: उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीतील ठाकरेंची सेना सज्ज झाली आहे‌. उद्या दुपारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच सावंतवाडीत जंगी स्वागत होणार आहे. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित राहणार असा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.

शहरात होर्डिंग्ज, कमानी उभारल्या गेल्या आहेत‌. स्वतः खासदार विनायक राऊत यांनी देखील याचा शुक्रवारी भेट देत आढावा घेतला. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी या दौऱ्यासाठी कंबर कसली आहे.

तर माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांनी देखील दक्षता घेतली आहे. स्वतः पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आज सकाळी सावंतवाडीत दाखल होत सभास्थळाची पहाणी केली.

डीवायएसपी संध्या गावडे व सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सभास्थळी दाखल होत त्यांना आढावा दिला.

You cannot copy content of this page