⚡सावंतवाडी ता.०२-: भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा “शक्तीवंदन ” अभियानांतर्गतकेरळ केंद्रीय पदाधिकारी श्रीमती वनिता हरिहरण व प्रदेश समन्वयक श्रीमती आम्रपाली साळवे या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना यावेळी सावंतवाडी भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस शर्वरी गावकर, जिल्हा चिटणीस मिसबा शेख ,तालुका सरचिटणीस प्रियंका गावडे, सावंतवाडी महिला मंडळ अध्यक्ष मोहिनी मडगावकर, आदी उपस्थित होत्या.
